Followers

गुरुवार, मार्च १०, २०२२

क्रांतीज्योती सावित्रीबाई !


सावित्री...तू नंदादिपातली वाती
तेजाळली दशदिशी अखंड ज्ञानज्योती

तूच दिला आम्हा एक महामंत्र…!
लढेन मी ! पण मिळविन विद्यातंत्र 

तुझ्या मुखी वदली संकल्पसिद्धी 
केले सज्ञान मज होते मी मंदबुद्धी

तू तोडीली बेडी आमुच्या पायीची 
रांधा वाढा उष्टी काढा परंपरांची

तूच श्वेतवस्रा सरस्वतीदेवी माझी
वंदिन चरण गाईन आरती तुझी 

ज्ञानदेव जमविला वारकरी पंढरी
दिनदुबळ्या लेकींची तू झाली वैखरी

तू दिल्या बळे घेते मी नभी भरारी
सुविचारांचे तोरण बांधिले मी दारी

मी आहे खंबीर उभी समस्त क्षेत्री
कृतज्ञ मी तुज क्रांतीज्योती सावित्री

©® पुष्पा पटेल " पुष्पम् "

९ टिप्पण्या:

  1. अप्रतिम रचनाविष्कार मॅडम...!✍️👌👌👌
    दिव्यत्वाची जेथ प्रचीती। तेरे कर माझे जुळती।
    क्रातीज्योती सावित्रीबाई फुले यांना शतशः नमन!🌹🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत सुंदर काव्यरचना...👏👏👏

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल