Followers

बुधवार, जानेवारी ०५, २०२२

अनाथांची माय

" अनाथांची माय: सिंधुताई यांना  शब्दसुमनांनी श्रद्धांजली !🌹🙏🏻

अनाथांचा ममत्वाचा वटवृक्ष कोसळला
आज काळ असा कसा हा निष्ठूर झाला

माई अनाथ लेकरांना तू तर दिली माया 
माई तुझा जाण्याने लाखोंची हरवली छाया

तुझाविना ओस आज ममता बालसदन
माई, तुझा जाण्याने भासे जणू ते निर्जण

ज्याला नव्हते कुणी त्यांची तू माय झाली 
तुझा विना आता त्यांना कोण ग् वाली  

तूझा एकटीत सामावले सहस्र मातांचं जगणं
माई तुझा कार्यापुढे आभाळंही वाटे ठेंगणं

झाले बहू होतील बहू तुझ्यासम ना कोणी
माई,तुला श्रद्धांजली वाहते राहीन मी ऋणी

माईंना भावपूर्ण श्रद्धांजली!
           💐😭🙏🏻

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

१० टिप्पण्या:

  1. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏼🙏🏼💐💐

    छान रचना ...

    उत्तर द्याहटवा
  2. अलौकीक शब्दसुमनांची वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली!🌹🌹🙏🙏🙏
    एकेका शब्दातून माईचे अलौकिक कार्य मांडले आपण!

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम रचना..👌💐💐💐भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

    उत्तर द्याहटवा
  4. खरोखर खुप मनस्वी रचना ताई : .. माईंना साश्रू नयनांनी श्रद्धांजली😭😭🙏🙏💐💐

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...