मन माझे तुझ्यावर जडले
प्रेमाचं बीज कधी तू रे
हृदयी हो माझ्या पेरले
प्रितीचा रंगात तुझ्या
बेधुंद होऊनी मी रंगले
साजना कळेना मला रे
प्रेमांकूर कधी हे डवरले
प्रीत रोपटे गोंजारले तू
रोमरोमी बहरुन आले
पानोपानी वसंत फूलला
गंध सुमनांचे श्वासात मी कोंडले
मिठीत घेता तू मजला
हृदय हे ओथंबून आले
कळेना मज झाले काय असे
आज मी माझी नच उरले
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "
अतिशय सुंदर रचना 👌👌👌✍️✍️✍️
उत्तर द्याहटवावाहह, खुप सुंदर रचना...👏👏🥰🍫🍫💐💐
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम ताई
उत्तर द्याहटवासुंदर रचना केली 👌👌👌
उत्तर द्याहटवामॅडम, अप्रतिम रचनाविष्कार...!✍️👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर शब्द रचना
उत्तर द्याहटवाखरी खरी प्रीत ग ताई : सुंदर अलंकारिक प्रीत✍️👌
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाखूप छान👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच छान 👌
उत्तर द्याहटवाशुभ सकाळ 🙏
Good morning...!
🌷🌷🌷🌷🌷🌷
Atishay sunder rachna 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान ताई...👍👌✍️
उत्तर द्याहटवा