Followers

शनिवार, जानेवारी २२, २०२२

रुक्मीणीपती

रुक्मीणीपती
देवा,कृपाळा पांडुरंगा !🙏
भाव तव मनीचे उमजले रे
तू भाव भावनांचा भुकेला
गुढ हे अंतरीचे कळले रे

दयाघना, 
तुझा नामाचा रे मज
ऐसा लागावा छंद
विसर न व्हावा कधी
आळवीन नाम तुझे मुकूंद

पंढरीनाथा...
सुख दुःखाचा सागरी
तूच असावा सांगाती
योग सदा तुझा घडावा
दे प्रभो मज सन्मती!

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

१२ टिप्पण्या:

  1. रुक्मिणीपती, नरहरी, श्रीहरी ।
    कृपा धरी तू मजवरी ।।🌹🙏🙏🙏
    अप्रतिम भक्ती रचना!✍️👌🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. जय हरी विठ्ठल, पांडुरंग हरी,सुंदर रचना ताई 🌷🌷🙏🙏🙏🌷🙏

    उत्तर द्याहटवा
  3. खुप सुंदर भक्तीमय रचना...मन प्रसन्न झालं अगदी... धन्यवाद...🙏😊

    🙏जय हरी विठ्ठल🙏

    उत्तर द्याहटवा
  4. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल खूप सुंदर लिहले

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...