उजाडली विश्वासाची पहाट
शिवरायांना जन्म देऊन
मांडला स्वराज्याचा थाट
अनंत यातना सोसल्या
परी हार न मानिली आई
स्वराज्याचे बाळकडू पाजून
पेटवली ज्योती राजांचा हृदयी
तूच घडविला मॉंसाहेब
एकेक श्वासासवे महा इतिहास
शब्दच झाले खड्ग तुझे
केला जुलमी सत्तेच्या -हास
घडविला तू जाणता राजा
अलौकिक शिकवण देऊन
त्रिवार वंदन जिजाऊ तुजला
आज मानाचा मुजरा करुन
🙏🌹🙏
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "
सुंदर रचना ....👌👌👌👌
उत्तर द्याहटवासुंदर काव्यरचना 👌
उत्तर द्याहटवाअलौकिक शब्दसौदर्य!👌
उत्तर द्याहटवाराजमाता जिजाऊसाहेब यांना विनम्र अभिवादन 🌹🙏🙏🙏
प्रेरणादायी कविता
उत्तर द्याहटवावाहह , खुप सुंदर रचना, अप्रतीम शब्दांकन...👌👍💐🍫
उत्तर द्याहटवा🚩जय जिजाऊ🚩जय शिवराय🚩
अतिशय सुंदर 👌👌👌👌🙏🙏
उत्तर द्याहटवा