Followers

शुक्रवार, डिसेंबर १७, २०२१

आई

रमते घरात मायेने ती असते आई !
सर्वांच्या हिताचे निर्णय घेते ती आई !

स्वतःचा इच्छा बाजूला सारते आई !
घरासाठी कष्टत जगते ती तर आई !

सुख दुःखात ठाम उभी असते आई !
संकट येता बाळावरती वाघिण होते आई !

' होईल सगळं नीट ' म्हणून धीर देते आई !
भिऊ नको! चालत रहा! बळ देते आई !

बाळाच्या सुखात लोभ न दावी आई
निष्काम कर्मयोग शिकवित जगते आई!


© पुष्पा पटेल "पुष्पम्"

९ टिप्पण्या:

  1. अप्रतिम रचनाविष्कार मॅडम...!✍️👌👌
    आईचे वर्णन शब्दात होणे अशक्यच! म्हणूनच श्रृती म्हणते " मातृ देवो भव!"🌹🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम काव्य ✍️✍️.. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी👌👌 .

    उत्तर द्याहटवा
  3. आई ही आईच असते तिची बरोबरी कोणीही करू शकणार नाही

    उत्तर द्याहटवा

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...