Followers

मंगळवार, सप्टेंबर २१, २०२१

सख्या रे!

सख्या रे

सांजवेळ झाली आता
थकली रे वाट पाहून
चाहूल लागता तुझी रे
हसू ओसंडलं ओठातून

तुला बघताच ऋतूराज 
वसंत फुलला मम हृदयी
गंगा यमुना बघताच रे
पाण्यावर धावल्या गायी

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

मनमौजी (शेलकाव्य)


कळत नाही मला रे तुझं

तुझं हे वेळी अवेळी येणं

न  सांगताच रे अचानक

अचानक चिंब भिजवणं


तू येऊन  भिजवतो चिंब

चिंब  होता  मोहरते अंग

माझेच कळत नाही मला

मला क्षणात करी नि:संग

 

आठवतो तो सुखाचा क्षण

क्षण ते  विसरू कसे रे मी

गिरकी   मारुन  घेते   फेर

फेर   धरते  मनमौजी   मी


© पुष्पा पटेल "पुष्पम्"


शनिवार, सप्टेंबर १८, २०२१

एल्गार

 [ सद्य परिस्थिती पाहता महाराष्ट्रात व देशात सर्वच राज्यांमध्ये लेकी-बाळींवर अत्याचाराच्या घटना अनुभवास येत आहे.हे हृदय पिळवटून निघते.त्या अनुषंगाने स्फूरलेली हे काव्य!]


फुलण्याआधी कोमेजून गेल्या

कितीक कोवळ्या सुंदर कळी

नाव असे निर्भया...

मानव विरुद्ध दानववृत्ती झाली बलवान

कितीक झाल्या वासनाच्या बळी

 वासनांध ते हृदयी नसे दयामाया

नराधम कृत्य ओरबाडती ते काया...

बहिरे सरकार नसे रुदन ऐकाया

नको हे यज्ञकुंड! नको झोकू तू काया

उठ...ए नारी ! तू हो नारायणी !

घे हाती तळपती तलवार हो भवानी

बस्स!नको रडणे नको कुढणे 

आता एकच आपुला निर्धार!

मिळून सा-या जणी आपण 

करु नवा एल्गार ! 

नको दया नको माया 

जे जे नाठाळ त्यांना दे धरणी ठाय!

किती आले करुन गेले वायदा

डोळ्यांवर पट्टी बांधून उभा आंधळा कायदा

आपण होऊ दुर्गा चंडी कालिका

नराधमांना लावू शिवकायदा

हाच ग् खरा न्याय...

संपवू आता आपण ! 

आपुल्यावरचा अघोरी अन्याय!


© पुष्पा पटेल " पुष्पम् "

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...