Followers

रविवार, ऑक्टोबर १७, २०२१

गालावरची खळी(भूलोळी)

रुक जावो री साजणी

पाहू दे गालावरची खळी

चाॅंद सा मुखडा है तेरा ओं प्यारी

तुझ्यासाठी आणली मी गुलाबाची कळी

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

काहूर


तुझ्या शब्दसुमनांनी सख्या

काहूर मनी दाटले रे...

ऋणानुबंध हे जन्मोजन्मीचे

प्रेम हृदयी दाटले रे...

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

शनिवार, ऑक्टोबर १६, २०२१

फुंकर

सख्या वेदनेला घालू हळूच फुंकर
घालू या मनाला समजूत आपण
काहूर मनात दाटले आता दुःखाचे
कुणी ना कुणाचे धिराने जगू दोघेजण

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

मेनका (भूलोळी)

बरसात की रात थी
प्रिये तू भिजून चिंब झाली
मुझको भाये रुप सुहाना तेरा
स्वर्गाहून जशी मेनका अवतरली

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, ऑक्टोबर १५, २०२१

जीवनबाग

देवा,  श्रीरामा  मम  जीवन  बाग
बाग  आनंद  फुलांनी  उमलू  दे !
क्षणिक दुःखालाही नसावी जागा
जागा  फक्त  सुगंधा  दरवळू  दे !

🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹

💃🏽 विजयादशमी - दसरा पावन 
सणाच्या आपणा सर्वांना मंगलमय -
शुभदायक मन:पूर्वक शुभेच्छा!
   🌹🙏❤️🙏🌹❤️🙏

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...