Followers

सोमवार, ऑक्टोबर ११, २०२१

देव माझा नाविक

सख्या,देऊ एकमेकांना साथ
वाट तशी कठीणच आहे

जीवन सागराची खोली
अगाध,अनाकलनीय आहे

देवा,तूच रे आमुचा नाविक 
तरबेज तू!मला विश्वास आहे

जन्म-मरणाच्या सागरात
देवा तूच माझा श्वास आहे

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

रविवार, ऑक्टोबर १०, २०२१

फुंकर

वेदनेला  ही  आपुलीच  फुंकर   घालू
घालू  समजूत  रे  आपुल्याच  मनाला 
सख्या कोणी कोणाचे नसते रे या जगी
जगी स्वार्थाचा भरे मेळा सांग  मनाला

© पुष्पा पटेल "पुष्पम्"

प्रेम(भूलोळी)

एक दूजे के लिये हैं
सुख दुःखात आधारासाठी
दो जिस्म इक जान हैं हम पिया
वाट्टेल ते कराया तयार प्रेमासाठी

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शनिवार, ऑक्टोबर ०९, २०२१

प्रेम

धडकन जाणती हैं
तू फक्त माझंच प्रेम आहे
बिन तेरे साजन जिया लागे ना
हाक ऐकून दिली साद सिद्ध तू आहे

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

राजा राणी

धडकन मेरी बोले
तू माझा राजा मी तुझी राणी
चाहत मेरी तेरे प्यार की प्यासी
घे ना राजा मीठीत बाहू तुझे खोलूनी

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

शुक्रवार, ऑक्टोबर ०८, २०२१

ऐक ना! [ त्रिवेणी रचना ]

💎 त्रिवेणी -१

खूप काही  आहे  तुला  सांगण्यासाठी
पण् वेळ कुठे तुझ्याकडे ऐकण्यासाठी?
माझं म्हणणं  ऐक  ना  क्षणभरासाठी..!

  ❤️         🌷         💘       🌹

💎 त्रिवेणी -२

तुला  पाहिले  अन्  मी   कल्पनेत न्हाले 
शब्दसुमने  गुंफून  काव्यमाला   बनविले
तुझ्या सुरांत सूर मिसळून अभंग गायीले

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

हास्य (भूलोळी रचना)

तेरी सुंदर मुस्कान 

🌹             ❤️

गाली तुझ्या चंद्राची खळी ग्

🌙         🌕          💎

ओठोकी लाली जैसी गुलाब कली

🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌹

प्रितभूंगा  हा  हृदय  घायाळ  करी  ग्

🐝  ❤️   🌈    🐝   💞.     💘

© पुष्पा पटेल " पुष्पम् "

ओल्या सांजवेळी!

सख्या ओल्या सांजवेळी  मन माझे हिंदोळ्यावर झुले  तू येण्याची चाहूल लागताच  हृदयी माझ्या वसंत फुले  सख्या ओल्या सांजवेळी  नजर माझी...