बावरले मन येण्याची वाट पाही
पहा...आज वाराही स्तब्ध होई
तुझ्या मुखचंद्र पाहण्या त्यालाही झाली घाई !
© पुष्पा पटेल " पुष्पम् "
कळत नाही मला रे तुझं
तुझं हे वेळी अवेळी येणं
न सांगताच रे अचानक
अचानक चिंब भिजवणं
तू येऊन भिजवतो चिंब
चिंब होता मोहरते अंग
माझेच कळत नाही मला
मला क्षणात करी नि:संग
आठवतो तो सुखाचा क्षण
क्षण ते विसरू कसे रे मी
गिरकी मारुन घेते फेर
फेर धरते मनमौजी मी
© पुष्पा पटेल "पुष्पम्"
सख्या ओल्या सांजवेळी मन माझे हिंदोळ्यावर झुले तू येण्याची चाहूल लागताच हृदयी माझ्या वसंत फुले सख्या ओल्या सांजवेळी नजर माझी...