आयुष्याचा प्रत्येक टप्प्यात
नविन मैत्रीणींची साथ आगळी
पण् बालपणीचा मैत्रीणींची
गंमत असते बरं जगावेगळी
मैत्रीचा सुगंध दरवळे
आसमंती चोहीकडे
भातुकलीचा खेळ अन्
लुटूपुटूची भांडणे गं गडे
क्षणात रुसवे क्षणात दोस्ती
एकाच चाॅकलेटचे करी दोन तुकडे
जीवाला असते जीव देणारी
आनंदी आनंद जिकडे तिकडे
आठवण येता बालपणीची
जाई मन माझे हो माहेरा
अक्षय तृतीयेचा झोपाळ्यावर
झोका घेऊन परत येई त्वरा !
©®सौ पुष्पा पटेल "पुष्पम्"
अप्रतिम रचनाविष्कार...यालाच तर म्हणतात ' रम्य ते बालपण!' मयुरपंखी आठवणी संजीवक शब्दांत मांडल्या.✍️👌🌟🌟🌟🌟🌟
उत्तर द्याहटवागोड कविता केली.. भावनात्मक
उत्तर द्याहटवा