जीवनाच्या कवितांनी भरली
माझ्या काव्यग्रंथाची पाने
सुख अश्वावर होऊन स्वार
मी गाते सुमधूर जीवनगाणे
जीवनाच्या कवितेत माझ्या
आहे बरं आनंदाची हो पानं
त्या पानांना जपते हळूवार
वाटते मी सुखाचे हो दान
जीवनाच्या कवितेत माझ्या
निरागस बालपणाचं पान
मौज - मज्जा आणि खेळ
आहेत जणू आनंदाची खाण
जीवनाच्या कवितेत माझ्या
सप्तरंगी जबाबदारीचे पान
आपुलकीच्या दृष्टीने बांधून
वाटते स्नेह सौख्याचे वान
जीवनाच्या कवितेत माझ्या
सहजीवनाचं अनोखं पान
विश्वास समर्पण हृद्यप्रेमाने
अहोंचा हृदयी मिळविले स्थान!
©®सौ.पुष्पा पटेल "पुष्पम्"
अप्रतिम रचना ताई
उत्तर द्याहटवासुंदर काव्य रचना✍️👌👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम शब्दसौदर्य... अप्रतिम रचनाविष्कार मॅडमजी! ✍️👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूपच छान. सुंदर रचना 👌
उत्तर द्याहटवाआबा
वावा सुंदर
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर 👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा