आपण शिकूया काव्यप्रकार
आज आपण अष्टाक्षरी काव्यरचना करुया.
चला तर बघूया याचे नियम. हा काव्यप्रकार खूप सोप्पा असतो.
1) प्रत्येक ओळीत आठ अक्षरे असतात,
2) चार ओळीचं एक कडवं...
3) प्रत्येक कडव्यात दुसऱ्या आणि चौथ्या ओळीत यमक साधावा.
4) प्रत्येक ओळीत पहिला शब्द हा सम असावा... म्हणजे दोन चार सहा अक्षरी
5) कडवेही सम संख्येत असतात. चार कडवे,सहा कडवे, आठ कडवे अशी रचना असते.
उदाहरणार्थ आपण येथे एक कविता लिहून समजून घेऊ!
लेखन प्रकार- अष्टाक्षरी काव्य
* शुभ वेळ *
कर्म असता चांगले
वेळ येई समाधानी
होई प्रगती निश्चित
तीच असे सत्य वाणी
कार्य कराया मिळते
संधी हो फक्त एकदा
टाळू नये तीला कधी
घ्यावा सदैव फायदा
हवी असेल प्रगती
खूप मेहनत करा
दारी येई अनुभवा
रोज दिवाळी दसरा
शुभ वेळ देतसे हो
काम करायला बळ
मोती मिळे सागरात
मारा बुडी शोधा तळ
©® पुष्पा पटेल " पुष्पम् "
मु.म्हसावद,ता.शहादा,जि.नंदुरबार
तर मग समजला न् अष्टाक्षरी काव्यप्रकार
मॅडम... अप्रतिम शब्दगुंफण !
उत्तर द्याहटवाअप्रतिम रचना मॅम 👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर शब्दांत अष्टाक्षरी लेखन माहिती दिली!✍️👌👌👌 धन्यवाद मॅडम!🙏
उत्तर द्याहटवाखूप सुंदर रचना ताई
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर रचना 👌👌👌
उत्तर द्याहटवाखुप सुंदर माहिती दिली आहे काव्यप्रकाराची.... 👌👌🙏🏼🙏🏼
उत्तर द्याहटवारचनाही सुंदर 👌👌👌👌
अप्रतिम सुंदर काव्यपप्रकार
उत्तर द्याहटवाछान👌👌
उत्तर द्याहटवाखुपच छान महिती आणि रचना🙏
उत्तर द्याहटवाछान माहिती दिलीत.
उत्तर द्याहटवासुंदर काव्यप्रकार 👌
उत्तर द्याहटवासुंदर काव्य 👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर माहिती दिली ताई 👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप छान माहिती ताई....✍️👍😀🍫🍫🍫
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर👌👌👌👍
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 👌👌👌👌
उत्तर द्याहटवावाहह..खुप सुंदर काव्यप्रकार...खुप ऊपयुक्त माहीती दिली आपण सखी...मन:पुर्वक धन्यवाद...🙏😊
उत्तर द्याहटवा