Followers

बुधवार, ऑक्टोबर १३, २०२१

आई



 

आई हा असा वटवृक्ष आहे...
त्याला फुटतात माया, ममत्व,प्रेम,जिव्हाळा
आपुलकी अशा अनंत  पारंबी
आई नावाचा वटवृक्ष भूमीत उगवून आकाशाकडे झेपावला तरी,
भूमीशीच नाते सांगते पारंबी!
अगदी तसेच...
त्रिखंडात कितीही शोधली तरी
आई नावाच्या हा वटवृक्ष सापडायचाच नाही.
म्हणूनच," स्वामी तिन्ही जगाचा
            आईविना भिकारी "
असं म्हणता येते.
वैज्ञानिक संशोधनानुसार वृक्ष हे दिवसा ऑक्सीजन घेतात.रात्री कार्बन डायॉक्साईडचे उत्सर्जन करतात.म्हणून रात्री वृक्षाखाली झोपू नये असे म्हणतात.
पण... वटवृक्ष हा एकच असा आहे की तो रात्री सुद्धा ऑक्सीजन(प्राणवायू) उत्सर्जित करतो.
तसेच आईचेही सांगता येईल,
ती बाळाच्या जन्मापासून ते आपल्या स्वतःच्या मृत्यू पर्यंत बाळासाठीच जगते.अगदी प्राणवायू बनून...
आईला सांभाळा! ती हरवली तर तिच्या रुपातील आपला प्राणवायू निघून जाऊ शकतो.

  © पुष्पा पटेल  " पुष्पम्"
      म्हसावद.

१२ टिप्पण्या:

  1. आई...अमृताच्या कुंभ! अप्रतिम रचनाविष्कार!✍️👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सुंदर लिहिले...व्वा....!🌹🙏🌹

    उत्तर द्याहटवा

देवा...

देवा,एक धागा सुखाचा  तू दिला रे माझ्या हाती उजेड देण्या सृष्टीला... वळीन मी जन्मभर वाती © सौ.पुष्पा पी.पटेल